
पुढील २५ वर्षाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंढरपूर येथे सर्कल ऑफिसची उभारणी करणार!
(पंढरपूर परिसरात ४०० केव्हीचे सब स्टेशन उभा करणार:- आ.समाधान आवताडे)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पुढील२५ वर्षातील विजेचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पंढरपूर परिसरात ४०० केव्ही चे सब स्टेशन उभे केले जाणार असून पंढरपूर येथे सर्कल ऑफिस ची निर्मिती देखील येत्या काही दिवसात होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
मंगळवेढा येथील महावितरणच्या शहर कार्यालयात आर डी एस एस योजनेतून आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या अतिरिक्त नवीन १०एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील शेतकरी,उद्योजक यांना पुरेशा व अखंडितपणे वीजपुरवठा व्हावा या दृष्टीने गेल्या पंधरा दिवसापूर्वी ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या समवेत बैठक घेतली आहे त्यामध्ये लांबोटी हे जिल्ह्यात एकमेव ४०० केव्ही चे सब स्टेशन असून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पंढरपूर परिसरात दुसरे ४०० केव्ही सबस्टेशन करण्याची मागणी केली आहे सोलापूर प्रमाणे पंढरपूर येथे सर्कल ऑफिस होणार आहे. त्यामुळे नवीन उद्योग धंदे वाढीस लागणार आहेत. तसेच मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर्स साठी दहा कोटी निधीची मागणी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे केले असून लवकरच निधी मिळेल. बोराळे, मंगळवेढा शहर, हुलजंती, निंबोणी येथे अतिरिक्त पावर ट्रांसफार्मर बसविले जाणार असून अकोला, सोडी, शिरशी येथे नवीन सब स्टेशन प्रस्तावित आहेत.तर लक्ष्मी दहिवडी, मंगळवेढा शहर, एमआयडीसी मंगळवेढा मारोळी येथे नवीन सबस्टेशन मंजूर असून त्याची कामे सुरू झाले आहेत.
येथील कार्यकारी अभियंता विजय पाटील त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी चांगल्या पद्धतीने सेवा देत असल्याचे सांगून त्यांनी कौतुकाची शाबासकी दिली. मंगळवेढा शहरात वीजपुरवठा खंडित झाल्यास शहरातील पूर्ण वीज जावू नये यासाठी सेपरेशन चे काम 15 दिवसात पूर्ण होणार आहे. ग्रामीण भागात विद्युत केबलीकरन सुरू असून ग्राहकांना त्याचा फायदा होत आहे. मंगळवेढा येथे विभागीय कार्यालय निर्मितीमुळे पुढची 25 वर्ष चांगल्या पद्धतीने विजेची सेवा मिळावी व्हावी अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले आ.समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मतदार संघात कोट्यवधीचा निधी आला असून विजेची अनेक कामे मार्गी लागली आहेत. नवीन अतिरिक्त दहा एम व्ही ए ट्रान्सफॉर्मर मुळे मंगळवेढा शहराला उच्च दाबाने व अखंडीत वीज मिळणारआहे.त्यामुळे मंगळवेढेकरांची अनेक दिवसाची मागणी पूर्ण झाली आहे.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले, तालुक्याचा भूमिपुत्र आमदार झाल्याने गेल्या अनेक वर्षापासून रखडलेले वीज, पाणी,रस्ते ही महत्वाचे प्रश्न मार्गी लागले आहेत.भविष्यात देखील तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी आ.आवताडे प्रयत्नशील आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी कार्यकारी अभियंता विजय पाटील,उपकार्यकारी अभियंता संतोष मरळी,जिल्हाध्यक्ष शशिकांतचव्हाण,औदुंबर वाडदेकर, प्रकाश गायकवाड,अजित जगताप,शिवानंद पाटील,प्रदीप खांडेकर, निलाताई आटकळे,सोमनाथ आवताडे चंद्रकांत घुले,युवराज शिंदे, विनायक यादव चंद्रकांत पडवळे,शिवाजी सरगर, ॲड दत्तात्रय तोडकरी,संजय माळी,राहुल सावंजी,धनंजय खवतोडे, समाधान हेंबाडे,गणेश शिंदे,बबलू सुतार शाखा अभियंता शरद पाटील
प्रशांत गायकवाड,दत्तात्रय आसबे, अमर कांबळे, योगेश खेर,यांच्यासह विद्युत ठेकेदार, अधिकारी,नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
