मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ” पाणीदार आमदार “या कार्य अहवालाचे प्रकाशन संपन्न!
आमदार शहाजीबापू पाटील यांनी 2019 मध्ये आमदार झाल्यापासून सांगोला तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर करून ती मार्गी लावली. कार्यतत्पर आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील शेती सिंचनाच्या अनेक योजना मंजूर करून त्या कार्यान्वित केल्या . आमदारकीच्या काळात तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी कधीही दुष्काळाची जाणीव होवू दिली नाही . त्यामुळे आमदार शहाजीबापू पाटील यांना पाणीदार आमदार म्हणून तालुक्यासह राज्यात ओळखले जाते. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते आमदार शहाजीबापू पाटील यांच्या” पाणीदार आमदार “या कार्य अहवालाचे प्रकाशन शुक्रवार दिनांक ०४ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी करण्यात आले. आमदार शहाजीबापू पाटील, उद्योगपती प्रवीण चौगुले, युवा नेते ओंकार लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
सन 2019 ते 2024 या पाच वर्षाच्या कार्यकाळात आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार झाल्यापासून आजपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी 5 हजार कोटीहून अधिक विकास निधी खेचून आणला . या विकास निधीतून पाच वर्षात केलेल्या शेती सिंचनाच्या विविध योजनांमध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना, टेंभू उपसा सिचन योजना, म्हैसाळ उपसा सिंचन योजना, नीरा उजवा कालव्याची वाढीव कामे यासह विस्तारित शिरभावी पाणीपुरवठा योजना ,ग्रामीण भागासाठी जलजीवन मिशन योजना मार्गी लावल्या. तालुक्यातील विविध रस्त्यांची कामें, जलसंधारणाची कामे, नगरपालिका कार्यक्षेत्रातील विकास कामे, आरोग्य विषयक कामे करुन तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला .
आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या या कार्याची माहिती मतदारसंघातील नागरिकांना देण्याकरिता” पाणीदार आमदार” कार्य अहवाल पुस्तिका तयार करण्यात आली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण गाव निहाय केलेल्या कामाचा तपशील या कार्य अहवालात समाविष्ट असून लवकरच नागरिकांना गावनिहाय कार्यपुस्तिका उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती या पुस्तिकेचे प्रकाशक माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ यांनी दिली आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणीदार आमदार या कार्य अहवालाचे प्रकाशन करीत आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या विकास कामांची प्रशंसा केली. या कार्य अहवालात तालुक्यातील विकास कामांचा संपूर्ण आढावा व गोषवारा फोटोसह पुस्तक रूपात तयार करण्यात आला आहे.