*उजनीत होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी शंभर कोटीची तरतूद करा:आमदार.समाधान आवताडे*
(१०० कोटी उजनीच्या पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी वापरावेत, सभागृहात उपस्थित केला प्रश्न)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने उजनी धरणावर पर्यटन स्थळ उभारण्यास मंजुरी दिली असून 541 कोटी 18 लाखाचा आराखडा तयार झाला आहे यामध्ये महाराष्ट्रात पर्यटन वाढीसाठी अनेक उपक्रम राबवले जाणार असून राष्ट्रीय दर्जाचे कृषी पर्यटन स्थळ उजनी धरणावर उभारण्यात येणार आहे,मात्र विविध भागातून उजनीत येणाऱ्या रसायन मिश्रित पाण्यामुळे उजनीचे प्रदूषण वाढत असून ते पाणी पूर्णपणे प्रदूषित होऊन आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे यासाठी पर्यटन विकासासाठी मंजूर झालेल्या रकमेतून 100 कोटी उजनीच्या पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी वापरणार का? हा प्रश्न आमदार समाधान आवताडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केला.
पुढे बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था उजनी धरणावर अवलंबून असून सोलापूर साठी उजनी धरण वरदानी म्हणून धरणाकडे पाहिले जाते पिकाच्या व पिण्याचा पाण्याचा प्रश्न या धरणावरून सुटत आहे मात्र या धरणातील जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले असल्यामुळे यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यासाठी शासनाने प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलणे अत्यंत गरजेचे असल्याची बाब आमदार समाधान आवताडे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली.
उजनी धरण सोलापूर नगर व पुणे या जिल्ह्यात पसरलेले असून 145 किलोमीटर परिसरात पाणी पसरलेले असते धरणाजवळून सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने जल पर्यटनासाठी ही जमेची बाजू आहे,याशिवाय दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा रेल्वे मार्ग कुर्डूवाडी भिगवन या पट्ट्यातूनच गेला आहे.पंढरपूरचा पांडुरंग, तुळजापूरची तुळजाभवानी,अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र विविध राज्यातील भाविक सोलापुरात येतात त्यामुळे त्यांच्यासाठी उजनीवर झालेले जल पर्यटन आनंदाची पर्वणी ठरणार आहे त्यामुळे शासनाने हा जल पर्यटनाचा निर्णय घेतला असला तरी याबरोबर उजनीचे पाणीही स्वच्छ व आरोग्यदायी राहिले पाहिजे यासाठी स्वतंत्र निधीची उपलब्धता करून जल प्रदूषणावर ही शासनाने काम करावे अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे
या प्रश्नाला उत्तर देताना कृषी मदत पुनर्वसन वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांची बैठक लावली असून या बैठकीमध्ये यावरती निर्णय घेण्यात येईल.
