
प्रा. रामदास झोळ सर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा “उत्कृष्ट संस्थाचालक” पुरस्कार प्राप्त!
(हा पुरस्कार म्हणजे माझ्या जीवनातील बहुमोल असा क्षण आहे:- प्रा.रामदास झोळ सर)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
*प्रा. रामदास झोळ सर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचा “उत्कृष्ट संस्थाचालक” पुरस्कार प्राप्त!*
*(हा पुरस्कार म्हणजे माझ्या जीवनातील बहुमोल असा क्षण आहे:- प्रा.रामदास झोळ सर)*
ज्या विद्यापीठात शिक्षण झालं, त्याच विद्यापीठात नोकरी केली आणि पुढे त्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत स्वतःच्या दत्तकला महाविद्यालयांची स्थापना केली — हीच तुमच्या दूरदृष्टी, चिकाटी आणि कार्यक्षमतेची प्रचिती आहे.
आज त्याच विद्यापीठाच्या कुलगुरुंसोबत “उत्कृष्ट संस्थाचालक” म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन!
हा सन्मान केवळ तुमच्या कर्तृत्वाचं नव्हे, तर विद्यार्थ्यांसाठी, सहकाऱ्यांसाठी आणि संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रासाठी एक प्रेरणास्थान आहे.
आदरणीय झोळ सर, तुमचं कार्य असंच यशस्वी होवो आणि तुमचं मार्गदर्शन नवीन पिढ्यांना लाभत राहो, हीच शुभेच्छा!
आदरणीय प्रा.रामदास झोळ सर आपले मनःपूर्वक अभिनंदन.
