
*महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल प्रा. रामदास झोळ यांच्याकडून सुरेश काळे यांचा सन्मान!
प्रा. रामदास झोळ यांनी काळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
करमाळा तालुक्यातील सुप्रसिद्ध असे कंदर गावचे सुपुत्र अक्षय सुरेश काळे यांची महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या पोलीस प्रमुख पदी निवड झाल्याबाबत श्री दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्राध्यापक रामदास झोळ, यांच्या शुभहस्ते त्यांचा शाल व श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी झोळ सरांनी अक्षय काळे यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक ज्येष्ठ नेते हरिभाऊ काका मांगवडे,, निभोरे गावचे सरपंच रवींद्र वळेकर, युवा नेते प्रवीण सांगडे, राज भाई पठाण, अजित वळेकर, वैजनाथ काळसाईत याचबरोबर प्राध्यापक झोळ सरांवर प्रेम करणारे असंख्य त्यांचे समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.