
प्रा.रामदास झोळ सर, भाजपामध्ये प्रवेश करणार!
उद्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार!
(करमाळा तालुक्यातील राजकीय गणिते इथून पुढे बदलणार!)
(आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा झेंडा फडकवणार:- प्रा रामदास झोळ)
दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील राजकीय समिकरणे मात्र निश्चितच बदलणारआहेत.प्रा. रामदास झोळ यांनी करमाळा विधानसभा निवडणूक लढविली होती. कोणत्याही पक्षाची साथ नसताना, कोणतेही राजकीय वजन नसताना त्यांनी शर्थीने खिंड लढवली.
करमाळा तालुक्यातील अनेक गांवाला पाणीपुरवठा,रस्त्यांना निधी, गोरगरिबांच्या मुलांना व मुलींना मोफत प्रवेश, वाशिंबे गावात कॉर्नर मिरर, वृद्धांना बाकडे, पाणी फाऊंडेशनच्या कामाला मदत, तरुणांना नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून हाताला काम असे अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केली आहेत. मकाई कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना मिळत नसलेली ऊसाची बिले वेगवेगळी आंदोलने करुनमिळवून दिली.
ते देशातील मोठ्या पक्षात जात आहेत याचा करमाळा वासियांना आनंद तर आहेच याच बरोबर ते आणखी ताकदीने विकास कामे करतील, अशी अपेक्षा आहे. उद्या दिनांक ०८/०७/२०२५ रोजी मुंबई मंत्रालय येथे प्रा. झोळ भाजपात प्रवेश करतील असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यांच्याबरोबर अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, काही सामाजिक कार्यकर्तेही प्रवेश करणार आहेत.
करमाळा तालुक्यातील व जिल्ह्यातील बहुसंख्येने पदाधिकाऱ्यांनी प्रा. रामदास झोळ यांच्याबरोबर भाजपात प्रवेश करुन जगात मोठी लोकशाही असलेल्या देशाची लोकशाही बळकट व्हावी आणि भाजपा सारख्या मोठ्या पक्षात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. रामदास झोळ फाऊंडेशन, प्रा. रामदास झोळ मित्र मंडळ व संपर्क कार्यालयाने केले आहे.