महायुतीचा आघाडी धर्म पाळून आमदार शहाजीबापू पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करणार : राजाभाऊ सरवदे
कविराज मंगल कार्यालयातील बैठकीस आरपीआय कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सन 2019 मध्ये सांगोला विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा (आठवले गट) जाहीर पाठिंबा देण्यात आला होता त्यावेळी आमदार शहाजीबापू पाटील हे 768 मतांनी विजयी झाले. सन 2024 मध्येही आमदार शहाजीबापू पाटील हे महायुतीकडून सांगोला विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाम. रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार यावेळेसही आमदार शहाजीबापू पाटील यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. पाठिंबाचे पत्र ही देण्यात येत असल्याची घोषणा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सांगोला येथे केली. सांगोला तालुक्यातील आरपीआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोबत घेऊन निवडणूक प्रचार यंत्रणा सक्षमपणे राबवावी. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. या निवडणुकीतही महायुतीचा आघाडी धर्म पाळून आमदार शहाजीबापू पाटील यांना सांगोला विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी करणार असल्याचा ठाम विश्वास आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सांगोला येथे व्यक्त केला.
सांगोला येथे आरपीआयची व आमदार शहाजीबापू पाटील यांची निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी बैठक संपन्न झाली.
यावेळी महाराष्ट्र राज्य संघटक सुनील सर्व गोड, महाराष्ट्र संघटक बापूसाहेब जगताप, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, जिल्हा सरचिटणीस रवी गायकवाड, अकरा तालुक्याचे अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तसेच पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी व सांगोला तालुक्यातील आरपीआयचे पदाधिकारी या बैठकीवेळी उपस्थित होते.
यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, आरपीआय पक्षाची यापूर्वीच्या निवडणुकीत सात लाभल्याने विजय झाला. यापुढेही पक्षाने मला साथ द्यावी. भविष्यात सर्व निवडणुका एकत्रीतपणे लढवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांनी आरपीआय पक्षाचा जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांची अहवाल पुस्तिका प्रकाशन कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरपीआयचे तालुका अध्यक्ष खंडू सातपुते यांनी सर्वांचे स्वागत करीत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी आरपीआयचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.