
पेनुर येथील श्री संभाजी राजे गायकवाड यांच्या शेतामध्ये मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण!
(अहिल्या नगरचे पी आय, श्री संभाजीराजे गायकवाड व तालुकाध्यक्ष रमेश लक्ष्मण माने शुभहस्ते लोकार्पण संपन्न)
सोलापूर जिल्ह्याचे त्यावेळचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पालकमंत्री निधीतून मंजूर झालेले पेनुर येथील ट्रांसफार्मर चे लोकार्पण अहिल्यानगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व पेनुर गावचे सुपुत्र, श्री संभाजीराजे अभिमन्यू पवार यांच्या शेतामध्ये बसवून झाल्यानंतर त्याचा लोकार्पण सोहळा, पोलीस निरीक्षक संभाजी राजे गायकवाड मोहोळ तालुका दक्षिण मंडळाचे तालुकाध्यक्ष रमेश लक्ष्मण माने ज्येष्ठ मार्गदर्शक श्री अभिमन्यू (भाऊ) गायकवाड, या सर्वांच्या शुभहस्ते पेनुर येथील त्यांच्या शेतामध्ये संपन्न झाले. अनेक वर्षापासूनची असलेली मागणी तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्या पाठपुराव्यामुळे व तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या निधीमुळे पूर्णत्वास गेली असून या व अशा विधायक कामांसाठी परिचित असणारे तालुकाध्यक्ष रमेश माने यांचे या सर्व कामामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.. सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजूर झालेले ट्रांसफार्मर (D.P) लोकार्पण झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचा विजेचा मूलभूत प्रश्न सुटला असल्यामुळे सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे..
या कार्यक्रमास, भाजपा तालुकाध्यक्ष रमेश माने, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री अभिमन्यू (भाऊ) गायकवाड, प्रगतशील बागायतदार अचित (वस्ताद)चवरे, महाराष्ट्र पोलीस श्री दत्तात्रय शेंबडे, श्री अण्णासाहेब सलगर, बाळासाहेब चवरे,श्री दादासाहेब गवळी, तानाजी पुजारी, अक्षय माने, महावितरणचे श्री अरुण कोळेकर साहेब कॉन्ट्रॅक्टर तानाजी माने, व श्री मानाजी माने उपस्थित होते.
