
पेनुर येथील शिरसागर वस्ती रस्त्याचे दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम पूर्ण!
(दक्षिण मंडल तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्या प्रयत्नातून सदर रस्त्याचे काम संपन्न)
मोहोळ तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या, पेनुर गावातील क्षीरसागर वस्ती येथील रस्त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम पालकमंत्री जयकुमार (भाऊ) गोरे साहेब, अक्कलकोटचे आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी, मा. आमदार राम (भाऊ) सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तसेच सोलापूर (पूर्व) भाजपा जिल्हाध्यक्ष मा. शशिकांत (नाना) चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व मोहोळ तालुका दक्षिण मंडलाचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्या प्रयत्नातून पूर्ण करण्यात आले आहे.
सदरील पेनूर गावातील क्षीरसागर वस्तीवरील रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरण काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकार्पण करण्यात आले..
या प्रसंगी क्षीरसागर वस्ती रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरण काम पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण करताना पेनुर उपसरपंच व उद्योजक सागर (मास्तर) चवरे ,प्रगतशील बागायतदार अचित चवरे,भारत कोरे (साहेब), निलेश कारंडे, शुभम कारंडे, दिलीप गवळी, माऊली क्षीरसागर, गणेश क्षीरसागर, सुधीर क्षीरसागर उद्योजक मुन्ना राऊत, अजित वाघमोडे, धनाजी कदम, श्रीकांत क्षीरसागर मादी मान्यवर उपस्थित होते.
कोट
मोहोळ तालुक्यातील दक्षिण मंडलातील सर्व गावांमध्ये आम्ही पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, मा आ राम (भाऊ) सातपुते भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत (नाना) चव्हाण, यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली सर्व गावांमध्ये निधी आणून जी राहिलेली सर्व कामे आहेत ची पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
रमेश माने
तालुकाध्यक्ष दक्षिणमंडल
मोहोळ