
पेनुर येथील चवरे-गायकवाड वस्तीमधील नवीन ट्रांसफार्मर चे लोकार्पण संपन्न!
(दक्षिणमंडलातील सर्व गावांना शासनाच्या सर्व योजनेतून अधिकाधिक लाभ देण्याचा ऑटोकाठ प्रयत्न करणार:- रमेश माने)
पेनुर चवरे-गायकवाड, वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण संपन्न पेनुर (चवरे , गायकवाड,माने वस्ती) येथे आज नवीन ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण करण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री मा. श्री. चंद्रकांत पाटील यांच्या जिल्हा नियोजन निधीतून, मोहोळ दक्षिण भाजपा मंडल तालुका अध्यक्ष श्री. रमेश माने यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आलेल्या मंजुरीनंतर पार पडले.
चवरे व गायकवाड , माने वस्तीवरील शेतकऱ्यांना सुलभ आणि सातत्यपूर्ण वीजपुरवठा मिळावा या उद्देशाने स्वतंत्र नवीन , ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला होता.
नवीन ट्रांन्सफार्मरचे लोकार्पण करताना पेनुरचे उपसरपंच , उद्योजक श्री. सागर (मास्तर) चवरे व श्री किसन (भाऊ) चवरे, श्री ज्ञानेश्वर राजगे (महाराज) यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी नक्षत्र लॉन्सचे मालक उद्योजक श्री. समाधान माने, श्री अचित चवरे, श्री. आण्णासाहेब सलगर, श्री. दादासाहेब गवळी, श्री. ज्ञानेश्वर गायकवाड, श्री. वैजीनाथ चवरे, श्री विलास माने, श्री तानाजी पुजारी,श्री. शुभम चवरे, श्री. यशवंत (तात्या) चवरे, अजिनाथ चवरे , श्री जनार्दन चवरे, श्री तानाजी माने,श्री. अभिजीत चवरे , श्री शिवाजी शिनगारे, विक्रम चवरे, श्री. उमेश चवरे, श्री मानाजी माने,श्री. भीमराव गायकवाड, सुभाष गायकवाड, अक्षय गायकवाड,श्री नवनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे गायकवाड चवरे व माने वस्ती परिसरातील शेती व घरगुती वीज पुरवठा अधिक सक्षम होणार आहे.