
पेनुर मधील चवरे-कांरडे वस्तीवरील नवीन ट्रांसफार्मरचे लोकार्पण!
(तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व रमेश माने यांच्या प्रयत्नातून झाले होते ट्रान्सफॉर्मर मंजूर!)
तत्कालीन पालकमंत्री मा. उच्चशिक्षण व तंत्रज्ञान मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या जिल्हा नियोजन फंडातून मोहोळ दक्षिण भाजपा तालुकाध्यक्ष श्री रमेश माने यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या पेनुर येथील चवरे-कारंडे वस्तीतील नवीन ट्रांन्सफार्मर चे लोकार्पण तालुकाध्यक्ष रमेश माने यांच्या उपस्थितीत पार पडले!
या नवीन ट्रांसफार्मरमुळे परिसरातील शेतकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने विजपुरवठा होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे.
या कार्यक्रमासाठी,प्राचार्य श्री. देविदास रणदिवे सर, ग्रा.सदस्य लक्ष्मण चवरे, अचित चवरे, गणेश चवरे, सदाशिव चवरे, धनाजी वाघ, निलेश चवरे, अरुण कोळेकर, मंथन चवरे, हरी चवरे, सुदर्शन चवरे, अजित वाघमोडे, निलेश कारंडे, तानाजी माने, हनुमंत शिरसागर, रोहित चवरे, दत्ता मुळे व अनेक मान्यवर उपस्थित होते.