मोहोळ मतदार संघात काल झालेल्या मेळाव्यानंतर अँड पवन गायकवाड यांचे पारडे जड!
राखीव विधानसभा मतदारसंघात बाहेरचा “उपरा नको, भूमिपुत्र हवा” अशा कार्यकर्त्यांच्या घोषणा!
निष्ठावंतांचा युवा संवाद मेळाव्यानंतर मोहोळ तालुक्यातील प्रस्थापितांचे धाबे दणाणले
(शरदचंद्रजी पवार साहेब अँड पवन कुमार गायकवाड यांच्या उमेदवारीवर करू शकतात शिक्कामोर्तब?)
काल रविवार दिनांक 23जून रोजी कामती येथील कटरे मंगल कार्यालयामध्ये झालेल्या, मोहोळ तालुका निष्ठावंत यांचा युवा संवाद मेळाव्यामध्ये महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष महेबूब भाई शेख, यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याला सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते बळीराम काका साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी एडवोकेट दीपक गायकवाड हे भूमिपुत्र असून त्यांना उमेदवारी मिळावी अशी आपल्या भाषणातून मागणी केली. काही वक्त्यांनी तर मोहोळ तालुक्यात दोन पाटलांमधील वाद किती टोकाला गेला आहे. त्याचा सर्वसामान्य गोरगरीब व दिनदली जनतेला कोणताही फायदा नाही एकमेकावर चिखल फेक करण्यात हे नेते दिवसभर कसे व्यस्त असतात याची अनेक उदाहरणे या कार्यक्रमांमधून सर्वांना दिली. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब गटाचे सरचिटणीस महेश माने यांनी तर अक्षरशा मोहोळ तालुक्यातील सर्व प्रस्थापित व विस्थापित नेत्यांना आपल्या भाषणातून धुवून काढले.
हे नेतेमंडळी बाजूला गेल्यामुळे आम्हाला कसा पवार साहेबांपर्यंत जाण्यासाठी पेस मिळाला व सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे कशा पद्धतीने तालुक्यात होऊ लागली असे आपल्या भाषणातून त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
एडवोकेट पवन कुमार गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्येष्ठ नेते तसेच जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे सुद्धा प्रयत्नशील असून त्यांनी आपल्या भाषणातून देशाचे ज्येष्ठ नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे पूर्ण तालुक्याचा अहवाल घेऊन जाणार असल्याचे सांगितले व सध्या परिस्थितीत महाविकास आघाडीला कसे मोहोळ तालुक्यामध्ये पोषक वातावरण आहे व खासदार प्रणिती ताई शिंदे यांना संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वात जास्त मताधिक्य मोहोळ तालुक्याने दिल्यामुळे येथील उमेदवारीला पुन्हा एकदा मोठे महत्त्व आले असून या युवा संवाद मेळाव्याच्या माध्यमातून अँड पवन गायकवाड यांची जवळजवळ पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही नेत्यांनी उमेदवारी निश्चित मानली जात आहे?