
पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मोठी मागणी!
(श्रीकांत आबा शिंदे यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन केली ही मागणी)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे अजित दादांच्या राष्ट्रवादीच्या श्रीकांत शिंदे यांची मागणी
सोलापूर जिल्ह्यात बार्शी येथे नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल आहे. तसेच जिल्ह्यात इतर खाजगी हॉस्पिटल आहेत. परंतु सध्याच्या राहणीमानामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. याचा विचार करून सामान्य नागरिकांसाठी पंढरपूर उपजिल्हा रूग्णालयात कॅन्सर आजारावर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास सामान्य नागरिकांची सोय होईल. तरी या मागणीचा विचार करून कॅन्सरवर उपचार करणेसाठीची यंत्रणा सुरू करण्यास संबंधितास आदेश द्यावा अशी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
पंढरपूर हे महाराष्ट्रातील मोठे तिर्थक्षेत्र असून लोकसंख्या ही वरचेवर वाढत आहे त्यात काही कॅन्सर आजाराने त्रस्त नागरिक आहेत त्यांना उपचारासाठी पंढरपुरात सोय नसल्याने बाहेर परगावी उपचारासाठी जावे लागत आहे त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटूंबियांना मानसिक , आर्थिक व शारीरिक त्रास होत आहे त्यामुळे पंढरपुरातील उपजिल्हा कॅन्सरग्रस्त रूग्णावर उपचारांची सोय झाल्यास रूग्णांना व पंढरपूरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
सत्तेमध्ये सहभागी असलेल्या अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच आरोग्यमंत्र्यांकडे ही मागणी केली असल्यामुळे आता ही मागणी नेमकी कधी मान्य होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण पंढरपूर शहरवासीय व ग्रामीण भागातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना ही मागणी मंजूर झाल्यानंतर सर्वात मोठा दिलासा मिळणार असून रुग्णवाह त्यांच्या नातेवाईकांचा शारीरिक,मानसिक व आर्थिक त्रासही या मागणीमुळे कमी होणार आहे.
