पंढरपूर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप शिंदे यांनी पंढरपुरातील चोरी गेलेल्या स्वच्छतागृहांसाठी केले आंदोलन
पंढरपूर नगरपालिकेने दिले लेखी आश्वासन
पंढरपूर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वतीने सहा महिन्यापूर्वी पंढरपुरातील चोरी गेलेल्या मुताऱ्या (स्वच्छतागृह) याच्याबद्दल पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले होते त्यावेळेस जाधव साहेबांनी बर बघू दोन महिन्यांमध्ये करतो असं आश्वासन दिले होते
मात्र दोन महिन्यानंतर अनेकदा गेलो तेव्हा अजून सांगितले एक महिन्यांमध्ये करतो असं सहा महिने त्यांनी आम्हाला गाजर दाखवायचं काम केले त्याचा निषेध म्हणून पंढरपूर शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदिप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली
आज बुधवार दिनांक १९ जून रोजी झोपेचे सोंग घेणाऱ्या नगरपालिका प्रशासनाला जाग करण्यासाठी अनोख्या पध्दतीने आंदोलन करत हलगी व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले यावेळी नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळवजकर यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी स्वरूपात एक महिन्यांमध्ये काम करतो असं सांगितले मग आंदोलन मागे घेण्यात आले .
या आंदोलनाला प्रमुख उपस्थिती काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर , सचिव राजाभाऊ उराडे सेवादल शेहराध्यक्ष गणेश माने विधानसभा उपाध्यक्ष सोमनाथ अरे सोशल मीडिया शहराध्यक्ष महेश अधटराव जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष बबलू रत्नपारखे युवक उपाध्यक्ष रवी अग्रवाल संग्राम मुळे देवानंद इरकल शिवकुमार बावलेकर आरपीआय उपाध्यक्ष अनिल माने व भाजी विक्रेता महिला महानंदा आळसुंदे मनीषा आस्वारे सुमन तरंगे पवार नागराबाई पवार भाजी विक्रेता महिला व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.