
पंढरपूर येथील डी वाय एस पी डॉ अर्जुन भोसले यांची बदली तर नूतन डीवायएसपीपदी प्रशांत डगले!
पंढरपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांची बदली झाली असून नूतन उप विभागीय पोलीस अधिकारी जागी प्रशांत डगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस आधिकारी प्रशांत डगले हे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर या तालुक्याचा पदभार ते पाहत होते.गृह विभागाने बदलीचा आदेश जारी केल्याने पंढरपूर तालुक्याला नवीन डी वाय एस पी प्रशांत डगले यांच्या रूपाने मिळाले आहेत
नवीन रूजू झालेले डी वाय एस पी प्रशांत डगले यांच्यासमोर पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू तस्करी, अवैध दारू तस्करी आणि विक्री तसेच अवैध रीत्या मावा, गुटखा वाहतूक, विक्री रोखण्याचे आव्हान असणार असून याप्रमाणेच पंढरपूर शहरातील गँगवॉर,भुरटी दादागिरी, महिला व मुलींची छेडछाड रोखण्यासह अनेक आव्हान असणार आहे.
नूतन पोलीस अधिकारी या अवैध धंद्यांवर कसा वचक बसवतील याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.