पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी पतसंस्था नं.१ च्या चेअरमनपदी दिनेश साठे व्हॉइस चेअरमन पदी दत्तात्रय चंदनशिवे सेक्रेटरी पदी तानाजी अधटराव यांची बिनविरोध निवड
पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था नं.१ निवडणूक बिनविरोध पार पडली होती निवडून आलेल्या नूतन संचालक मंडळाची निवडणूक निर्णय अधिकारी पी.बी.सावंत चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी सभा आयोजित केली होती या झालेल्या सभेमध्ये पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी पतसंस्था नं.१ च्या चेअरमन पदासाठी दिनेश साठे व्हॉइस चेअरमन पदासाठी दत्तात्रय चंदनशिवे सेक्रेटरी पदासाठी तानाजी अधटराव यांचा एकच अर्ज आल्याने या सर्वांची बिनविरोध निवड झाल्याची जाहीर केले
यावेळी कामगार नेते संस्थचे माजी जेष्ठ संचालक अँड.सुनिल वाळुजकर, पंढरपूर नगर परिषद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सहकार्याध्यक्ष माजी संचालक शरद वाघमारे, प्रीतम येळे,अनिल पांडुरंग अभंगराव,आरोग्य अधिकारी. नागनाथ तोडकर हे उपस्थितीत होते. यावेळी नवीन नेतृत्व माजी चेअरमन व नूतन संचालक जयंत पवार, खंबीर नेतृत्व धनजी वाघमारे, चंद्रशेखर वेळापुरे, चिदानंद सर्वगोड,संभाजी देवकर,नवनाथ पवार, सौं.राणी गायकवाड, श्रीमती लक्ष्मी हुडेकरी याचाही सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी पी बी सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. आभार शरद वाघमारे यांनी मानले सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पतसंस्थेचे लिपिक श्री संजय माने यांनी परिश्रम घेतले