
पंढरीतील शिष्टमंडळाकडून ना. एकनाथ शिंदे यांचे आभार
अहिल्यादेवी सांस्कृतिक भवन दिल्याने केला सत्कार
पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक अहिल्यादेवी सांस्कृतिक भवन असावे अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भावनासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून दिला आहे. याबद्दल पंढरीतील एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन, आभार व्यक्त करीत सत्कार केला आहे.
या शिष्टमंडळमध्ये युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य तथा सोलापूर माढा लोकसभा युवती अध्यक्ष इंजी.प्रियांकाताई परांडे ,धनगर समाजाच्या रणरागिणी तसेच भाजप किसान मोर्चा प्रदेश सदस्य विश्रांतीताई भूसनर यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सांस्कृतिक भवन साठी जागा व निधी दिल्याबद्दल यांच्या समवेत साहेबांचे आभार मानले तसेच पंढरपूर येथील इतर विकास कामांच्या विषयांवर चर्चा झाली. येत्या शुक्रवारी पुढील बैठीकीसाठी वेळही देण्यात आली असल्याची माहिती इंजि प्रियांका परांडे यांनी दिली आहे.