
ऑपरेशन सिंदूर पराक्रमाच्या सन्मानार्थ मोहोळ येथे तिरंगा यात्रा!
(नूतन जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्यासह, दक्षिण मंडळचे तालुकाध्यक्ष रमेश माने यांची प्रमुख उपस्थिती)
मोहोळ येथे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जो पहलगाम अटॅक नंतर जे भारतीय सैन्यांकडून “ऑपरेशन सिंदूर” राबवण्यात आले त्याबाबत, भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी संपूर्ण मोहोळ तालुका हा तिरंगामय झाल्याचे,
यावेळी दिसून आले या तिरंगा यात्रे प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पूर्व नूतन जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, दक्षिण मंडळाचे नूतन तालुकाध्यक्ष रमेश माने माजी तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण, सुशील भैय्या क्षीरसागर, सतीश आप्पा काळे, माऊली भगरे, गणेश झाडे, शिवसेना नेते- रमेश बारस्कर
शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष चरणराज चवरे भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, संजीवभाऊ खिलारे,राजाभाऊ गुंड,बाळासाहेब पाटील,आण्णासाहेब सलगर,गणेश मुळे याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ कनिष्ठ आजी-माजी पदाधिकारी याचबरोबर सर्व मोहोळ तालुक्यातील भाजपा व मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या तिरंगायात्रेतसहभागी झाले होते.