चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम!
(पंढरपूर, मंगळवेढा,माढा तालुक्यात चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांचा दौरा)
पंढरपूर तालुक्याची आर्थिक वरदायणी असलेल्या श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन मा. अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांचा 39 व्या वाढदिवसानिमित्ताने पंढरपूर, मंगळवेढा, माढा, तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे.
उद्या दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी श्री संत नामदेव पायरी पंढरपूर येथे महाआरती, छत्रपती शिवाजीमहाराज चौक टेंभूर्णी येथे अभिवादन, श्री संत सावता माळी अरण येथे दर्शन, श्री माढेश्वरी मंदीर माढा येथे दर्शन, विठ्ठल कारखाना येथे कै.औदुंबर आण्णा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन,मंगळवेढा येथील श्री संत दामाजी मंदिर, जय भवानी मंदिर, श्री संत चोखामेळा समाधी,पिरसाहेब दर्गा यांचे दर्शन, पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थिती असा नियोजित दौरा असून भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महाआरोग्य शिबिर डोळे, काना, घसा, सर्व रोग तपासणी शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी अभिजीत आबा पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व समर्थकांनी व सर्व नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे मा.अभिजीत (आबा) पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे.