शिवसेनेच्या वतीने मतदार संघातील महिलांसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन
(गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेचा अनोखा उपक्रम!)
गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी ९ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला या ठिकाणी भजन स्पर्धा होणार आहे. सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण महिला भजनी मंडळास प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे. भजन स्पर्धेसाठी ७ सप्टेंबरपूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे अशी माहिती या स्पर्धेचे संयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख तथा माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांनी दिली.
शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सव व संत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी ९ सप्टेंबर रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम बक्षीस २१ हजार रुपये, द्वितीय बक्षीस १५ हजार रुपये, तृतीय बक्षीस ११ हजार रुपये देण्यात येणार आहे. सांगोला शहरातील प्रत्येक सहभागधारक महिला भजनी मंडळास १५०० रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच
सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक सहभागधारक ग्रामीण महिला भजनी मंडळास २५०० रुपयांचे प्रोत्साहन बक्षीस देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे भजनी मंडळातील सदस्य संख्या ७ ते ११ पर्यंत असावी, प्रत्येक भजनी मंडळास गायनासाठी पंधरा मिनिटे वेळ राहील, भजनी मंडळातील सर्व सदस्यांना ड्रेसकोड आवश्यक, प्रत्येक मंडळांने आपआपले साहित्य (वाद्य) वादक साथीदार स्वतः जबाबदारीने आणावे, भजनी मंडळास फक्त गणपती किंवा गजानन महाराजांचा कोणताही एका अभंग गायनास परवानगी असेल पण राहीलेले एक अभंग व एक गवळण गाथ्यामधील गायन करणे बंधनकारक राहील, प्रत्येक भजनी मंडळातील वेगवेगळ्या महिला सदस्यांनी गायन करणे बंधनकारक राहील, भजन स्पर्धेसाठी नाव नोंदणी ७ सप्टेंबरपूर्वी करणे आवश्यक आहे, नाव नोंदणी करताना आपल्या मंडळातील प्रत्येक सदस्याचे नाव व व्हाट्सअप मोबाईल नंबर तसेच आधार कार्ड झेरॉक्स देणे आवश्यक आहे. प्रत्येक सदस्यास एकाच वेळी व एकाच मंडळात सहभाग नोंदवणे गरजेचे आहे, जर एकच सदस्य दोन मंडळात आढळून आला तर त्या दोन्हीही मंडळांना बाद ठरविले जाईल व स्पर्धेतून बाहेर काढले जाईल. ९ सप्टेंबर रोजी भव्य महिला भजन स्पर्धेदिवशी सर्व महिला भजनी मंडळांनी सकाळी ९ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहणे आवश्यक आहे. या भजन स्पर्धेसाठी प्रत्येक भजनी मंडळास नाव नोंदणी नंतर टोकन नंबर दिला जाईल, याच टोकन नंबर प्रमाणे स्पर्धा सुरू होतील. जर एखादे महिला भजनी मंडळ त्यांच्या दिलेल्या टोकन नंबर नुसार न हजर राहिल्यास पुढील मंडळास सादरीकरणाची अनुमती दिली आईल. जे भजनी मंडळ वेळेत हजर राहणार नाही त्यांना सर्वांत शेवटी नंबर दिला जाईल.