मनसेच्या वतीने आमदार अभिजीत पाटील यांचा नागरी सत्कार
अभिजीत पाटील यांना केलेल्या कामाची पोहोचपावती जनतेने दिली : दिलीप धोत्रे
भारतनाना नंतर जनतेने मला स्वीकारले : अभिजीत पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या वतीने माढ्याचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांचा पंढरपूर येथील मनसे कार्यालयात सत्कार करण्यात आला.
यावेळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हलगीच्या कडकडाटात आणि फटाक्याची आतषबाजी करून आमदार अभिजीत पाटील यांना क्रेनच्या साह्याने भला मोठा हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना दिलीप बापू धोत्रे म्हणाले की अभिजीत पाटील यांनी केलेल्या कामाची पोचपावती नागरिकांनी त्यांना आमदार करून दिली आहे. भविष्यकाळात अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न कायमचे सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जनतेच्या मनातील आमदार म्हणून अभिजीत पाटील यांना जनतेने निवडून दिले याबद्दल मतदार संघात नागरिकांचे त्यांनी आभार मानले. याप्रसंगी अभिजीत पाटील आमदार म्हणजे आपण आमदार आहोत असे उदगार दिलीप धोत्रे यांनी काढले.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की हा सन्मान हा माझ्या घरचा सन्मान आहे. मी या परिसरात लहानाचा मोठा झालो या परिसरातील नागरिकांनी माझी जडणघडण केली आहे. माझ्या यशामध्ये येथील नागरिकांचा मोठा वाटा असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.
ते पुढे बोलताना म्हणाले की माढा मतदारसंघातील नागरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. पुढील काळात परिसरातील प्रश्न सोडवण्याचे काम करणारा असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी दिला.
भारत नाना नंतर जनतेने मला स्वीकारले आहे. पुढील पंढरपूर नगरपालिका निवडणूक लढवून शहराच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आमदार माढ्याचा जरी असलो तरी पंढरपुरातील विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास दिला.
यावेळी त्यांनी अनेक प्रसंगांना उजाळा दिला.