दिनांक १७ जुलै रोजी आषाढी एकादशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मराठा समाज भवनाचे भूमिपूजन
(कार्यक्रमाचे आमंत्रण मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले:महेश नाना साठे)
 पंढरीत मराठा भवन व्हावे याकरिता मागील अनेक वर्षाची मागणी होती. ती मागणी मान्य होऊन, इमारतीसाठी पाच कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीच्या भूमिपूजन समारंभासाठी  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित रहावे यासाठी मराठा समाजाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख महेश साठे यांनी भेटून पंढरपूर येथील मराठा भवनाच्या भूमिपूजनाचे निमंत्रण दिले.
यावेळी  पंढरपुर मराठा समाज बांधवाच्या  वतीने मुख्यमंत्री तसेच  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  अजित पवार   महोदय  यांचे आभार मानले. आपल्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिले मराठा भावन आपण पंढरपूर येथे मंजूर केले.त्यास तात्काळ पाच कोटी रुपये देखील दिले असल्याने,  पंढरपूर येथील मराठा समाज बांधवानी   मुख्यमंत्री महोदय हे 17जुलै रोजी पंढरपूर येथे महापूजेसाठी येत असल्याने याच दिवशी मराठा भवनाचे भूमिपूजन आपल्या हस्तै व्हावे.अशी निमंत्रण पत्राद्वारे विनंती  करण्यात आली आहे. हे निमंत्रण स्वीकारून मुख्यमंत्री  यांच्याकडून या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण स्वीकारले आहे.
   यावेळी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले  उपस्थित होते.

