चित्रा नक्षत्राच्या पावसामुळे माढा मतदारसंघात पिकांचे व जमिनीचे अतोनात नुकसान’आपत्कालीन व्यवस्थापन’ नुसार शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी:आ.बबनदादा शिंदे
मागील पाच ते सहा दिवसापासून चित्रा नक्षत्राच्या नियमित व दमदार होत असलेल्या पावसामुळे माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रफळातील महत्त्वाच्या हाता-तोंडाशी आलेल्या ठिकाणच्या खरीप पिकांना व फळबागांना मोठा फटका बसलेला आहे, तसेच शेतात पाणी साठल्यामुळे जमीन चिबड होऊ लागली आहे व रब्बी हंगामातील ज्वारी हरभरा गहू या पेरण्या लांबणीवर पडणार आहेत. या सर्व नैसर्गिक आपत्ती नुकसानीमुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे या सर्व ठिकाणचे कृषी विभाग व महसूल विभागाने त्वरित पंचनामे करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन पिके वाचवण्यासाठी शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारचे निवेदन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे.
विशेष वृत्तांत असा की पावसाळ्यातील शेवटचे चित्रा नक्षत्र सुरू झाल्यापासून चार ते पाच दिवस सर्वत्रच पाऊस काही प्रमाणात पाऊस सुरू आहे. परंतु माढा विधानसभा मतदारसंघातील श्रीपुर महाळुंग वाघोली वाफेगाव तसेच करकंब तुंगत भोसे कान्हापुरी बेंबळे परिते टेंभुर्णी मोडनिंब बावी उपळाई बुद्रुक सोलंकरवाडी भेंड पडसाळी, भुताष्टे चिंचोली रोपळे खुर्द वडाचीवाडी उपळाई बुद्रुक अंजनगाव तसेच माढा विभाग व कुर्डूवाडी परिसरात तुफान पर्जन्यवृष्टी झालेली आहे. यामुळे खरीप हंगामातील उडीद मका द्राक्ष तुरी केळी चारा वैरण तसेच द्राक्ष डाळिंब केळी पेरू आदी फळबागा यांचे अतोनात नुकसान झालेले आहे व अति पाण्यामुळे जमिनी ‘चिबड’ बनल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यावर निसर्गाचा कोप वाटत आहे व सर्वत्र हवालदिल व निराशागत वातावरण तयार झाले आहे. नियमित दररोज पाऊस पडत असल्यामुळे व ऑक्टोबर हिट ची उष्णता सर्वत्र असल्यामुळे संसर्गजन्य रोगामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे.
पावसाच्या पाण्यामुळे शेतात उभ्या असलेल्या फळबागांचे व खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले स्पष्ट दिसून येत आहे .तसेच माढा मतदारसंघात जवळजवळ सर्वच महसूल सर्कल विभागा मधून शंभर ते 110 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे आणि याचा सर्वात जास्त फटका माढा तालुक्यातील बावी उपळाई बुद्रुक मोडनिंब या परिसराला बसला आहे. महागाईमुळे प्रचंड आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी शासनाकडून नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत आहे त्यामुळे आमदार बबनदादा शिंदे आणि जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट या तत्त्वाखाली जिल्हाधिकारी कृषी अधीक्षक तसेच तिन्ही तालुक्याच्या प्रत्येक उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट तातडीने पंचनामे करून शासनामार्फत शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी सक्तीची आग्रही भूमिका पत्राद्वारे कळवलेली आहे. सर्वत्र शेतकरी मदतीच्या अपेक्षित आहेत हे निश्चित.