आहेरगाव- परिते रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी नऊ कोटी रुपये मंजूर:रणजितसिंह शिंदे
आहेरगाव – भुईंजे गावांच्या विकास कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे, आहेरगाव नॅशनल हायवे हद्द ते परिते या महत्त्वाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 9 कोटी 29 लाख रुपये मंजूर असून येत्या दहा दिवसाचे आत हे काम सुरू होणार आहे असे प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी आहेरगाव येथे गाव भेट दौऱ्याप्रसंगी केले आहे. अधिक बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की या परिसरात सिना-माढा सिंचन योजनेच्या पाण्याचा काही भागाला लाभ मिळत नाही परंतु पाईप लाईन द्वारे किंवा कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत व थोड्याच दिवसात हे काम यशस्वी होऊन मार्गी लागेल. या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी रस्त्याची खूप अडचण असेल त्या ठिकाणी भक्कम मुरमीकरण करून देण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे, आपण आम्हाला रस्त्यांची नावे व अंतर कळवावे असेही रणजीत शिंदे यांनी यावेळी सांगितले . याप्रसंगी नुकत्याच संपन्न झालेल्या आमदार बबनदादा शिंदे यांच्या 73 व्या वाढदिवसाचे निमित्ताने येथील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी वादीचे क्रियाशील कार्यकर्ते रामभाऊ शिंदे तसेच मुकुंद महालिंगडे संतोष पाटील धनाजी महालिंगडे प्रद्युम्न महालिंगडे भागवत करंडे महादेव घाडगे आप्पासाहेब पाटील राजाभाऊ अजगर ज्ञानेश्वर जोरवर- पाटील आकाश जगताप यांचे सह गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रस्तावना व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.