विद्यार्थ्यांचा विघ्नहर्ता” म्हणून ओळखला जाणारा बाप्पा, न्यू सातारा कॉलेजमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विराजमान होत आहे. याही वर्षी कॉलेजच्या प्रांगणा मध्ये गणरायाची स्थापना करण्यात आली असून, संपूर्ण सजावट पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आली. या गणरायाच्या आगमनाच्या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. विक्रम लोंढे सर, उपप्राचार्य विशाल बाड सर सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
सात दिवसासाठी विराजमान होत असलेल्या या बाप्पाच्या सेवेसाठी विद्यार्थी अतिशय उत्सुक होते. बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर, गणरायाची आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. बापाच्या आगमनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये लेझीम स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पीपीटी प्रेसेंटेशन स्पर्धेचे आयोजन ही करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेमधील विजेता व उपविजेता ठरलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसही देण्यात येणार आहे.
सात दिवसानंतर बाप्पाच्या विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मोठया मिरवणूकीचे नियोजन हे यंदाचे वैशिष्ट्य आहे. विसर्जनाच्या दिवशी इकोफ्रेंडली गणेशोत्सव आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर कॉलेजमधील कृत्रिम तलावामध्ये या गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात येईल.
बाप्पाच्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे प्रतिनिधी मा. श्री. ज्ञानेश्वर शेडगे साहेब यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सचिन पुरी सर यांनी केले तसेच महाविद्यालयाच्या कल्चरल कमिटीचे विशेष सहाय्य या कार्यक्रमासाठी लाभले.
