न्यु सातारा पॉलीटेक्निकचा गो ईव्ही चार्जिंग इन्फ्रा या कंपनीसोबत सामंजस्य करार
सध्याच्या काळात इलेक्ट्रिक वाहने (EVs) सतत लोकप्रियता मिळवत असल्याने ऑटोमोटिव्ह उद्योगात उल्लेखनीय परिवर्तन होत आहे. तांत्रिक प्रगती, वाढत्या पर्यावरणविषयक चिंता आणि लोकांच्या पसंती बदलून, पारंपारिक ज्वलन इंजिन वाहनांसाठी ईव्ही हा एक टिकाऊ आणि कार्यक्षम पर्याय म्हणून उदयास आला आहे, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून न्यु सातारा मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक व गो ईव्ही चार्जिंग इन्फ्रा या कंपनी मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या कंपनीद्वारे विद्यार्थ्यांना नोकरी व उद्योग याविषयीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे .ईव्ही चार्जिंग स्टेशनची स्थापना शाश्वत भविष्यासाठी वचनबद्धता दर्शविते असे यावेळी संस्थेचे प्राचार्य विक्रम लोंढे यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच या संदर्भात बोलताना प्राचार्य लोंढे म्हणाले की, हे प्रशिक्षण मेकॅनिकल इंजीनियरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागातील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. तसेच शिक्षकांनाही या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे यामध्ये विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे कार्यशाळा ,गेस्ट लेक्चर व इन प्लांट ट्रेनिंग देण्यात येणार आहे तसेच शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण स्वतः कंपनीचे संस्थापक अध्यक्ष विजय दयानंद बाबर यांच्याकडून देण्यात येणार आहे तसेच या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भविष्यामध्ये नोकरी आणि व्यवसायामध्ये फार मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हा करार करतेवेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री .राजाराम निकम साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम लोंढे उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.