
न्यु सातारा पॉलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांची हार्मन इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या नामांकित कंपनीत निवड!
हार्मन इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून न्यु सातारा मुंबई संचलित न्यु सातारा पॉलिटेक्निक महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी दिली.
हार्मन इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील ११ विद्यार्थी तर इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशन कम्युनिकेशन या विभागातील १५. विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
हार्मन इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी ऑटोमोबाईल व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे न्यु सातारा पॉलीटेक्निक मध्ये गेले चार-पाच दिवस वारंवार अशा नामांकित कंपन्या येत असून विद्यार्थ्यांचे ही विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा जपत विद्यार्थ्यांनी अनोखे यश संपादन केले आणि त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामुळे पालकांमधून सुद्धा एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यु सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब बोलताना म्हणाले की भविष्यात अनेक मोठ्या कंपन्यांना संस्थेमध्ये आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे संस्थेचे प्राचार्य मा. विक्रम लोंढे यांच्याकडून संस्थेने राबविलेल्या कार्यशाळा, इंडस्ट्रियल व्हिजिट यासारख्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यात जास्त फायदा झाला असे सांगून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड यांचे विद्यार्थ्यांना विशेषतः मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.