
न्यु सातारा कॉलेजमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
समाजातील अन्याय, दारिद्र्य, विषमता यांच्या विरुद्ध लढा देणाऱ्या
व आपल्या साहित्यातून वंचित व शोषित घटकांना न्याय देण्या चा प्रयत्न करणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी न्यु सातारा समूह संचलित न्यु सातारा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी कॉलेजचे उपप्राचार्य विशाल बाड यांच्याकडून दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमेस नारळ फोडून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बोलताना कॉलेजचे उपप्राचार्य विशाल बाड म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यामुळे अनेक पिढ्या प्रेरित झाल्या आहेत आणि आजही त्यांचे साहित्य आणि विचार लोकांना प्रेरणा देत आहेत तर लोकमान्य टिळक यांचे समाज प्रबोधन आणि स्वातंत्र्याच्या लढाईत दिलेल्या योगदाना बद्दल स्मरण करून देण्यात आले
यावेळी एडमिन ऑफिसचे प्रमुख संतोष कवठेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.