
न्यु सातारा कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त, चिंतन ,मनन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन
न्यु सातारा समूह मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक कॉलेज कोर्टी येथील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त चिंतन, मनन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री .माता निर्मलादेवी विश्वनिर्मधर्म सहजयोग ध्यान केंद्रातील श्री. गजेंद्र कुलकर्णी सर ,अंजली कुलकर्णी,नीता अष्टेकर,बाबा लवटे व गणेश ताडे लाभले. प्रमुख अतिथी कुलकर्णी सर यांनी
योग प्रात्यक्षिकासह सविस्तर माहीती दिली व योगासनाचे विविध प्रकार विशद केले. यात त्यांनी वीरभद्रासन, सूर्यनमस्कार, उष्टासन, भुजंगासन, कपालभारती, अनुलोम, विलोम, भस्त्रिका, योगिक जॉगिंग ,योगिक वॉकिंग इत्यादी आसने व प्राणायमचा सराव विद्यार्थ्यांकडून व शिक्षकांकडून करुन घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य लोंढे यांनी अध्यक्षीय भाषणात योग ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे हे नमूद करून, रोज सर्वांनी योग व ध्यानधारणा करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजाराम निकम साहेब यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमावेळी संस्थेचे संस्था प्रतिनिधी मा. श्री. ज्ञानेश्वर शेडगे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विशाल बाड, सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते