
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अजिंक्य अशोक क्षीरसागर यांची निवड!
(जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या शुभहस्ते पत्र देत त्यांचा केला सन्मान!)
(राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीला अजिंक्य क्षिरसागर यांच्या रूपाने मिळाला नवा तारा!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या मोहोळ तालुक्याच्या युवक अध्यक्षपदी अंकोली येथील युवकांचे आयडॉल तरुण कार्यकर्ते म्हणून ज्यांची संपूर्ण मोहोळ तालुक्यात ओळख आहे.
अशा अजिंक्य अशोक क्षीरसागर यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, यांच्या स्वाक्षरीने त्यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. खासदार श्री सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण यांच्या मान्यतेने सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या शुभहस्ते अजिंक्य अशोक क्षीरसागर यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. या माध्यमातून संपूर्ण मोहोळ तालुक्यामध्ये पक्ष वाढीसाठी व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व नवतरुण युवकांमध्ये पक्षाचे विचार रुजवण्यासाठी अजिंक्य अशोक क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे..
या त्यांच्या निवडीमुळे मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी मिळणार असून जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे यावेळी अजिंक्य क्षिरसागर यांनी सांगितले..*
*कोट*
*आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीण भागामध्ये बळकट करण्यासाठी व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी इथून पुढे सर्व नवीन नवतरुणांना सोबत घेऊन काम करणारा असून पक्षाचे सर्व विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे*.
*अजिंक्य क्षिरसागर*
*नूतन युवक तालुकाध्यक्ष मोहोळ*
