
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी वसंतराव देशमुख यांची निवड!
(या निवडीनंतर संपूर्ण जिल्ह्याबरोबरच पंढरपूर तालुक्यात देशमुख समर्थकांमध्ये आनंदोत्सव)
शंकरनगर येथील शिवरत्न बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम पार पडला.पक्षाचे प्रमुख शरद पवार,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या सुचनेनुसार सोलापूर जिल्हाध्यक्षपदी वसंतराव देशमुख यांचे निवडीचे पत्र विजयसिंह मोहिते पाटील यांची हस देण्यात आले.यावेळी खा.धैर्यशील मोहिते पाटील,आ.उत्तमराव जानकर,नागेश फाटे,बाबुराव गायकवाड,विश्वासराव बारबोले,जिल्हा कार्याध्यक्ष रवी पाटील,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, युवती आघाडीच्या विनंती कुलकर्णी,तालुकाध्यक्ष माणिकराव वाघमोडे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड.वजीर शेख,ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष अरुण तोडकर, सुभाष भोसले,राहुलशेठ शहा यांच्यासह जिल्हा,तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
निवडी प्रसंगी बोलताना नुतन जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख म्हणाले,शरद पवार व विजयदादांनी मोठी जबाबदारी सोपवली असुन नव्या,जुन्या कार्यकर्त्यांची मोठ बांधुन यशस्वीपणे जबाबदारी पार पाडु अशी ग्वाही दिली.
तर खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार व विजयदादा यांच्या श्रेयामुळे राष्ट्रवादीचा सोलापूर जिल्ह्यात दबदबा होता.पुन्हा पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी कार्यकर्त्यांना ताकद देणाची गरज असुन लोकहितासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारी ठेवावी.पक्षाध्यक्ष सुचना व स्थानिक आमदारांच्या विचाराने पक्षाच्या संघटनात्मक निवडी कराव्यात असे सांगुन येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांनी जागरुकपणे कार्यरत राहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पाटील यांनी केले तर आभार संतोष वारे यांनी मानले.