
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना.सुनिल तटकरे सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहोळ तालुका प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न!
(या बैठकीस जेष्ठ नेते अशोकदादा क्षिरसागर,समन्वयक मा.श्रीकांत शिंदे, राहूल क्षिरसागर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते)
मोहोळ येथे दिनांक १८ जुलै २०२५ रोजी सावली बंगला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न झाली मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मोहोळ तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक तालुका समन्वयक आणि पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस मा.श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. ही बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.सुनील तटकरे साहेब यांच्या आगामी सोलापूर जिल्हा दौऱ्याच्या (दिनांक २१ जुलै २०२५) पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवेश अध्यक्ष मा. सुनील तटकरे साहेब यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. यामध्ये विशेषतःमोहोळ तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या उपस्थितीत हा दौरा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
पक्षाच्या स्थानिक कार्यकारिणीने दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद, स्थानिक प्रश्नांवर चर्चा आणि पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी मार्गदर्शन यावर विशेष लक्ष केंद्रित केले. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते अशोक क्षीरसागर, अण्णासाहेब पाटील,राहुल क्षीरसागर, संजय विभूते,सुरेश भाऊ चव्हाण,बाबासाहेब बाबर,सौदागर खडके,नरखेडचे सरपंच बाळासाहेब मोटे,जे.वाय पाटील,गोरख पवार,सुमित पवार,फुलचंद सरवदे,मुजीब चौधरी, प्रसन्न पाटील,विजय दगडे,आकाश पाटील,प्रदीप पाटील,भाऊसाहेब धावणे, हरी पाटील,भाऊराव शिंदे,अविनाश सुरवसे,प्रमोद आतकरे,प्रज्ञा बनसोडे,सुवर्णा गजघाटे,आदीसह मोहोळ तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.