खासदार धैर्यशील मोहिते पाटील व उमेश पाटलांची पुण्यात भेट!
मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी दोनच दिवसांत निर्णय जाहीर करणार:उमेशदादा पाटील
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर “विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती” म्हणून कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यावेळी अनेकांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घ्या असा सल्ला उमेश दादा यांना दिला.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनीही राजीनामा देऊन मोठा धक्का दिला आहे.
दरम्यान उमेश पाटील यांनी तूतारी वाजवून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला त्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार यांना प्रेझेंट करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. गॅस पार्श्वभूमीवर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेश पाटील यांच्या पुणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली
त्यावेळी उमेश पाटील यांनी खासदारांचे मनोभावे स्वागत केले यावेळी मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, मावस भाऊ अकलुजचे डॅाक्टर जयंत शिंदे, आई लोपामुद्रा पाटील व मावशी रुक्मीणी साळुंके हे उपस्थित होते.
एकूणच राजकीय समीकरणे आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राजकीय वातावरण पाहता उमेश पाटील हे शरदचंद्र पवार यांच्या तुतारीच्या दिशेने पुढे जात असल्याचे दिसत असून खासदार मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर हे आता फिक्स झाल्याचे दिसत आहे.