मोहोळ वारकऱ्यांकडून राजू खरे यांचा सन्मान
(मोहोळचे वारकरी राजू खरे यांनी घेतली जबाबदारी)
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाचे आषाढी वारी नजीक आली असताना मोहोळतील भजनी मंडळांनी आपल्या भजनाचे साहित्य मिळावे यापेक्षा वारकरी संप्रदाय मधील अनेक जण रविवारी पंढरपूर येथील गोपाळपूर येथे राजू खरे यांची फार्महाऊसवर ते येऊन त्यांनी भेट घेतली
या भेटी प्रसंगी राजू खरे यांचा वारकऱ्यांनी यथोचित सन्मानही केला दरम्यान आलेल्या मोहोळ येथील वारकऱ्यांनी भजन करण्यासाठी लागणारे सर्व साहित्याची मागणी केली.
यावेळी मोहोळ येथील वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष धनाजी राऊत, सचिन शिंदे, सद्गुरु बारस्कर, नागनाथ माळी, कालिदास शेटे, चंद्रकांत बरकडे, जगदीश गोडसे, दत्तात्रय माळी, बापू सूर्यवंशी, नागेश मोठे, नानासो देवकते, आदी उपस्थित होते.
यापूर्वीही मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील भजनी मंडळ यांनी आपल्या मतदारसंघातील राजू खरे यांची भेट घेऊन भजनी मंडळाची साहित्याची मागणी करताच त्यांना साहित्य वाटप केले आहे. यामुळे भजनी मंडळींमध्ये राजू खरे यांच्या बद्दल मोठा आदर निर्माण झाला आहे.