मोहोळ तालुका पंचायत समितीच्या गटनेतेपदी संजीव दादा खिलारे यांची बिनविरोध निवड!
(पालकमंत्री जयकुमार गोरे व राजन मालक पाटील व जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्या विश्वासाला सार्थ राहून काम करणार:- प.स. सदस्य संजय दादा खिलारे)
(आष्टी सिंचन योजनेसाठी कायम प्रयत्न करून या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार:-संजीव दादा खिंलारे)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मोहोळ तालुका पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या गट नेते पदी श्री. संजीव माणिक खिलारे यांच्या नावाची घोषणा महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष, भाजपा सोलापूर जिल्ह्याचे जेष्ठ नेते व माजी आमदार मा. राजन जी पाटील साहेब यांनी केली. चळवळीतील एका लढावू बाण्याच्या अभ्यासू कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने व पक्ष नेतृत्वाने मोहोळ पंचायत समिती सभागृह गटनेता म्हणून संधी दिल्याने समाजातील सर्व स्तरातून चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
आज कृषी उत्पन्न बाजार समिती मोहोळ येथे भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांची बैठक आयोजित केली असता सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी मोहोळ पंचायत समिती सभागृह गट नेता निवडीचे सर्वाधिकार मा. राजन पाटील यांना दिल्याने त्यांनी श्री. संजीव खिलारे यांचे नाव सुचविले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, मोहोळ शहर व तालुका पूर्व अध्यक्ष सतीश (आप्पा) काळे, मोहोळ दक्षिण ता. अध्यक्ष रमेश माने, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा जिल्हाध्यक्ष मुजीब मुजावर, युवा मोर्चाचे मोहोळ तालुका अध्यक्ष अंकुश (भैय्या) आवताडे, मोहोळ नगरपरिषद उपनगराध्यक्ष दत्ता खवळे, नगरसेवक सुशील (भैय्या) क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य अनुक्रमे लखन शिंदे, बालाजी नरुटे, पंचायत समिती सदस्य अनुक्रमे अस्लम चौधरी, सौ. उल्का पाटील, सौ. पार्वती गावडे, सौ. निलम मसलकर, सौ. कोमल आवताडे, सौ. अमिरिका कापसे, अक्षय खताळ, माजी नगरसेवक संतोष सुरवसे, माजी नगरसेवक अण्णा फडतरे, मंगेश गुंड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
