
मोहोळ मधील दीर्घकाळाच्या रेल्वे थांबा मागणीला अखेर यश!
(जिल्हा अध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या प्रयत्नामुळे सिद्धेश्वर एक्सप्रेसला मोहोळ येथे थांबा)
(राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार यांच्या पत्रानंतर मोहोळ रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर)
मोहोळ येथील व्यापारी, पत्रकार, उद्योजक तसेच मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष मा. रमेश बारसकर व जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या दीर्घकाळाच्या रेल्वे स्थानकाला थांबा मागणीला अखेर यश मिळाले आहे.
या मागणीच्या पाठपुराव्यासाठी जिल्हा अध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार साहेब यांना सविस्तर पत्र दिले होते. या पत्रानुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 9/4/2025 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विन वैष्णव साहेब यांना अधिकृत पत्राद्वारे विनंती केली होती.
या सततच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी अधिकृत पत्र जारी करून मोहोळ येथील रेल्वे स्थानकावर निवडक गाड्यांचा थांबा मंजूर केला आहे.
या प्रक्रियेत मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस,राज्यसभा खासदार धनंनजय महाडीक सोलापूरचे पालकमंत्री मा.श्री.जयकुमार गोरे साहेब यांना देखील शिफारस पत्र देण्यासाठी विनंती व पाठपुरावा करण्यात आला होता.
ही ऐतिहासिक कामगिरी मोहोळच्या व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि तीर्थयात्रेसाठी नवा अध्याय ठरेल, यात शंका नाही.
या यशासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.
