म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील बंधारे, तलाव भरुन देण्यात येणार – आमदार शहाजीबापू पाटील
९ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार, ९१ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित
सांगोला म्हैसाळ प्रकल्पाच्या जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडी पासून वाढेगाव पर्यंतचे १५ बंधारे व नराळे, घेरडी व हंगीरगे असे तीन तलाव भरुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बंदिस्त नलिकेद्वारे १५ को.प. बंधारे भरुन दिल्यास कोरडा नदी पुनर्जीवित होऊन नदीलगतच्या गळवेवाडी, सोनंद, आगलावेवाडी, जवळा, कडलास, बुरुंगेवाडी, आलेगाव, मेडशिंगी व वाढेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रस्तावित कामासाठी अंदाजीत ९१ कोटी ६२ लाख रुपयांचा इतका खर्च अपेक्षीत असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
म्हैसाळ प्रकल्पाच्या पाचव्या मंजुर सुप्रमा नुसार मंजूर पाणीवापरा पैकी १ टीएमसी पाण्याचा वापर लाभक्षेत्रातील तलाव व को.प. बंधारे भरण्यासाठी राखीव आहे. पाणी वापरातून सांगोला तालुक्यातील कोरडा नदीवरील सर्व को.प.बंधारे भरुन देण्यासाठी जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे भरण्यासाठीच्या वितरण व्यवस्थेच्या कामाचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील सर्व को.प. बंधारे व वंचित गावांतील पाझर तलाव, गाव तलाव व इतर पाणीसाठे भरुन देण्याची मागणी केली होती. म्हैसाळ प्रकल्पाच्या सांगोला वितरीका क्र. १ वरील सिंचन क्षेत्र ४५९ हेक्टर आहे. सदर वितरिकेचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. या वितरिकेमुळे सांगोला तालुक्यातील डिकसळ गावांतील ४५९ हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. शिंगणहळ्ळी वितरीकेवरून सांगोला तालुक्यातील सोनंद गावांतील ७२ हे. क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
सांगोला वितरीका क्र.२ वरील मातीकाम, नाला बांधकामे पूर्ण झाले असून अस्तरीकरणाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. वितरीकेवरील १०० हे. पेक्षा जास्त सिंचन क्षेत्र असलेली ४ लघुवितरीकांची कामे बंदिस्त नलिकेची कामे १०० टक्के काम पूर्ण झाली आहेत. सांगोला वितरिका क्र. २ वितरीकांद्वारे सांगोला तालुक्यातील डिकसळ, पारे, हबिसेवाडी, नराळे, हंगिरगे, घेरडी, गावडेवाडी या ७ गावांच्या ३ हजार ४७१ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. सद्यस्थितीत पाऊस न झाल्यामुळे सर्वत्र टंचाईचे परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून बंधारे व तलाव भरुन देण्याची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीवरील थेट बंदिस्त नलिकेद्वारे तालुक्यातील गळवेवाडी पासून वाढेगाव पर्यंतचे १५ बंधारे व नराळे, घेरडी व हंगीरगे असे तीन तलाव भरुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बंदिस्त नलिकेद्वारे १५ को.प. बंधारे भरुन दिल्यास कोरडा नदी पुनर्जीवित होऊन नदीलगतच्या गळवेवाडी, सोनंद, आगलावेवाडी, जवळा, कडलास, बुरुंगेवाडी, आलेगाव, मेडशिंगी व वाढेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रस्तावित कामासाठी अंदाजीत ९१ कोटी ६२ लाख रुपयांचा इतका खर्च अपेक्षीत असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.