असंघटित कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबध्द – आमदार शहाजीबापू पाटील
कामगारांचा मार्गदर्शन मेळावा आणि गृहोपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न
सध्याच्या काळात कामगार संघटित होणे काळाची गरज आहे. शासनाच्या कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजना या तळागाळात पोहोचल्या पाहिजेत. असंघटित कामगारांचे प्रश्न शासन दरबारी सुटले पाहिजेत यासाठी आम्ही कार्यरत राहू. असंघटित कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले
नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित नोंदणीकृत कामगारांना गृहोपयोगी भांडी संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील, युवासेना तालुकाप्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे, शिवसेना शहर संघटक आनंदा माने, नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिसचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे, युवासेना शहर प्रमुख समीर पाटील, शिवसेना शहरप्रमुख ज्ञानेश्वर तेली यांच्यासह बांधकाम क्षेत्रात कामगार, महिला उपस्थित होत्या.
असंघटित कामगारांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की, तळागाळात असणारा प्रत्येक क्षेत्रातील कामगार हा संघटित झाला पाहिजे, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, त्यांचे विविध प्रश्न समजावून घेऊन ते शासन दरबारी मांडण्यासाठी कटिबध्द असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीने घरोघर काम करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या असंघटित नोंदणीकृत कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिसचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे यांनी सांगितले.