गलाई बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील कलकत्ता दौऱ्यावर
व्यवसायानिमित्त कलकत्ता येथे स्थायिक झालेल्या सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील शनिवारी कलकत्ता दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पश्चिम बंगालची कुलस्वामिनी कालीमातेचे दर्शन घेऊन श्रीराम वाटिका २० नंबर सलकीया स्कूल रोड हावडा हॉल कलकत्ता येथे आमदार शहाजीबापू पाटील गलाई बांधवांच्या अडचणी जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
व्यवसायानिमित्त कलकत्ता येथे स्थायिक झालेल्या सांगोला तालुक्यातील गलाई बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील शनिवारी कलकत्ता दौऱ्यावर रवाना झाले आहेत. शनिवार २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस एअरपोर्टवर आमदार शहाजीबापू पाटील यांचे आगमन होणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजता पश्चिम बंगालची कुलस्वामिनी कालीमातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता श्रीराम वाटिका २० नंबर सलकीया स्कूल रोड हावडा हॉल कलकत्ता येथे सर्व गलाई बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजय दिघे, राम चव्हाण, उत्तम जरे, दत्ता बुलबुले, महादेव जरे यांनी केले आहे.