
मराठा आरक्षणा साठी विशेष अधिवेशनाची मागणी कौतुकास्पद*
(आ.समाधान दादा अवताडे व अभिजीत आबा पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील तसेच माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय तरुण आमदार श्री अभिजीत पाटील यांच्या सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला एकत्रित पाठिंब्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार श्री.समाधान दादा अवताडे यांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिकृत पत्राद्वारे विशेष अधिवेशनाची मागणी केल्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनामध्ये अचानक ट्विस्ट आला असून आरक्षण लवकर मिळण्याविषयी अशीच कीरण निर्माण झाल्यामुळे भाजपाचे तरुण लोकप्रिय आमदार समाधान दादा अवताडे आणि महाविकास आघाडीचे तरुण तडफदार लोकप्रिय आमदार श्री.अभिजीतदादा पाटील यांच्यावर अखंड सोलापूर जिल्ह्यातून सर्व राजकीय पक्षांकडून विविध स्तरांमधून, सर्व समाजांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत असून विशेषतः श्री.समाधान दादा अवताडे हे स्वतः भारतीय जनता पार्टीचे आमदार असूनही त्यांनी धाडसाने सर्वप्रथम मागणी करत मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नर्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे विनंती करून पुढाकार घेतल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यामधून सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून, शेतकऱ्यांकडून आणि सर्व समाजातील प्रतिनिधींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून वरील चारही तरुण आणि लोकप्रिय आमदारांचा मोबाईल फोन सतत “बिझी” लागत आहे*.
————
चौकट
*”समाधान दादा आवताडे आणि अभिजीत आबा यांना जनतेकडूनच मिळाली शाब्बासकी”*
*आमदार समाधान दादा आवताडे हे स्वतः भारतीय जनता पार्टीचे आमदार असूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची खरी गरज ओळखून या आरक्षण मागणीला कोणताही राजकीय रंग न देता पक्षांतर्गत दबावाला न जुमानता सर्वप्रथम विशेष अधिवेशन बोलवण्या साठी पुढाकार घेतला ही घटना खूप कौतुकास्पद असून या निर्णयाबाबत मी सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने व तमाम मराठा समाज बांधवांच्या वतीने आमदार अवताडे यांचे मनस्वी आभार मानतो.सुदृढ लोकशाही राष्ट्राच्या निर्मितीमध्ये तरुण आणि लोकप्रिय आमदार समाधान दादा अवताडे तसेच आ.अभिजीत आबा पाटील यांच्याप्रमाणेच प्रगल्भ लोकाभिमुख दृष्टिकोन ठेवून सकारात्मक पद्धतीने एखाद्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून खरी गरज काय आहे हे निश्चित करून निव्वळ घाणेरड्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणाऱ्या आदर्श नेतृत्वांची निर्मिती होणे गरजेचे आहे. या दोघांनाही जनतेकडून “शाब्बासकी” मिळत आहे.केवळ पक्ष नेतृत्वाची *”एक्स्ट्रा कृपा”* मिळवण्याच्या स्वार्थी हेतूने *”उचलली जीभ लावली टाळ्याला”* अशा पद्धतीने काम करणाऱ्या आमदारांचे पीक सध्या भरपूर आले असून असल्या असल्या प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी राज्याच्या प्रगतीला घातक ठरू शकतात.
प्रा.संग्रामदादा चव्हाण
संघटक समन्वयक, भीमा परिवार
