
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला भाजपच्या मा. आमदाराचा जाहीर पाठिंबा!
(प्रणवदांदा परिचारक यांनी आझाद मैदानावर जात दिला जरांंगे यांना पाठिंबा)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाच्या चौथ्या दिवशी पंढरपूरचे माजी आमदार , भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्या पाठिंबाचे पत्र प्रणव परिचारक यांनी आझाद मैदानावर जाऊन सुपूर्त केले.
मुंबईमध्ये सुरू असलेल्या आरक्षण लढ्यामध्ये पंढरपूर मंगळवेढा सह सोलापूर जिल्ह्यातील अनेक मराठा बांधव सामील झाले आहेत. या आंदोलनाला पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, युवक नेते भगीरथ भालके , राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अनिल सावंत , मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आता यामध्ये पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावतीने त्यांचे पुतणे प्रणव परिचारक यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटलांच्या आंदोलनाला परिचारकांच्या पांडुरंग परिवाराच्या वतीने पाठिंब्याची पत्र दिले आहे. तसेच आरक्षण मिळण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करू अशी ग्वाही देखील यावेळेस प्रणव परिचारक यांनी दिली. या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांशी प्रणव परिचारक यांनी सविस्तर चर्चा देखील केली.
यावेळी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, पंढरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
