
माजी आ.बबनदादा शिंदे यांची प्रकृती सुधारण्यासाठी कारखान्याच्या अधिकारी व कर्मचारी यांचाकडून श्री दत्तगुरुस अभिषेक!
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांची प्रकृती सुधारण्यासाठी विठ्ठलराव शिंदे कारखाना कार्यस्थळावर श्री गुरूदेव दत्त मंदिरामध्ये दि.26 जून रोजी. विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद, अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने सामुहिक अभिषेक संपन्न झाली.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष व माढा तालुक्यात धवलक्रांती, हरितक्रांती, औद्योगिक व शैक्षणिक क्रांती घडवून आणणारे माढा तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार बबनदादा शिंदे हे हद्यय शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत सेंट लुईस येथे गेलेले आहेत. त्यांचेवर बी जे सी हॉस्पिटलमध्ये हद्शस्त्रक्रिया करणेत येणार असून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडून ते या आजारातून बरे व्हावेत यासाठी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद, अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने कारखाना कार्यस्थळावरील श्री गुरूदेव दत्त मंदिरामध्ये गुरूवार दि.26 जून रोजी सामुहिक अभिषेक पुजा व आरती करण्यात आली व आजारातून लवकर बरे होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत सक्रिय व्हावेत व त्यांना उदंड आयुष्य लाभावे अशी प्रार्थना श्री गुरूदेव दत्त चरणी करण्यात आली.
सदर प्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ सदस्य,सभासद, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, जनरल मॅनेजर पी.एस.येलपले,फायनान्स मॅनेजर डी.डी.लव्हटे,चिफ इंजिनिअ एस.डी.कैचे, चिफ केमिस्ट ए.के.जगताप, केन मॅनेजर एस.पी.थिटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, सिव्हील इंजिनिअर एस.आर.शिंदे, हेड टाईम किपर आर.एन.आत्तार, परचेस ऑफिस एस.व्ही.चौगुले,कामगार प्रतिनिधी ए.डी.वीर प्रशासनातील शशिकांत पवार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.