महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पाष्टे पक्षातून निलंबित!
पत्रान्वये झालेल्या नेमणूकाही बेकायदेशीर!
राष्ट्रीय समन्वयक किसान काँग्रेस प्रकाशजी घाले यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती
महाराष्ट्र प्रदेश किसान व शेतमजूर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पराग पाष्टे यांची नेमणूक अखेर बेकायदेशीर ठरवण्यात आली असून त्यांना काँग्रेस पक्षाच्या संविधानातील तरतूद असलेल्या पक्ष शिस्तीच्या संविधान कलम१९ कार्य समिती ग 3 च नुसार दोषी ठरवून पुढील सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. सविस्तर चौकशीअंती सदरचा निर्णय आदेश अखिल भारतीय किसान व शेतमजूर काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक तथा महाराष्ट्र राज्याचे प्रभारी श्री.प्रकाशजी घाळे यांनी त्यांच्या पत्रान्वये घोषित केला. सदरच्या नेमणुकीला पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यालयातून कायदेशीर नेमणुकीबाबत कोणताही दुजोरा दिला गेला नसून या पदाचा गैरवापर करत श्री.पाष्टे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस या पदावर त्यांच्या स्वाक्षरीने परस्पर पत्र देऊन स्वार्थी हेतूने ज्या नेमणुका केल्या त्याही आपोआप रद्द समजण्यात येतील. त्यामुळे बेकायदेशीर नेमणूक पत्राचा गैरवापर करत काँग्रेस पक्षाचे कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी यापुढे सदर पदावर काम करणे थांबवावे असेही सांगण्यात आले. त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात येईल. श्री.पराग पाष्टे यांनी केलेल्या नेमणुका पैकी काही जिल्ह्या तील पदाधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना स्वार्थी हेतूने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याच्या काही तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यामुळे सदर प्रकरणाची पक्षशिस्त संहिता नियमावली कलम 19 कार्य समिती (क)( ख )(ग) च्या अधीन राहून वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात आली असता हे पदाधिकारी पक्ष नेतृत्वाची तसेच जनतेची दिशाभूल करत असल्याचे व दोषी असल्याचे निदर्शनास आले.सदर नेमणुका बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आहेत.
कोट
अखिल भारतीय किसान काँग्रेसचा सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने मी श्री प्रकाश घाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहून सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काँग्रेस पक्ष मजबूत होण्यासाठी मी कटीबद्ध राहीन.
-प्रा.संग्राम दादा चव्हाण जिल्हाध्यक्ष सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस