*माढा तहसील मधली मुतारी मी रोज उडघतोय सापडत नाही:- बंडु नाना ढवळे*
*(शक्तीपीठ महामार्गाबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर पाच मे २०२५लाच पत्र व्यवहार केला होता)*
*(मुख्यमंत्र्यांच्या जवळ कोण आहे हे अगोदर आमदार साहेबांनी तपासून पहावे:- बंडु नाना ढवळे)*
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाची प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाबाबत रोज नवनवीन घडामोडी घडत असताना एकीकडे हा महामार्ग पूर्वी मोहोळ पंढरपूर सांगोला या मार्गे वळविण्यात आला होता. आता पुन्हा नव्याने हा महामार्ग बार्शी वैराग करमाळा कडील काही भाग व माढा मतदारसंघातील काही गावांमधून जाणार आहे. याबाबत रोज नवनवीन घडामोडी घडत असून हा मतदारसंघ माढा विधानसभा मतदारसंघातून जात असल्यामुळे यासाठी आजी माझी आमदारांमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे एकीकडे विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील तर दुसरीकडे माजी आमदार, बबनदादा शिंदे व रणजीत भैय्या शिंदे यांच्यामध्ये समर्थकांमध्ये जोरदार कलगी तुरा रंगला आहे.. एकीकडे विद्यमान आमदार यांचे समर्थक सांगत आहेत की हा शक्तीपीठ महामार्ग माढा मतदारसंघातून वळवण्यासाठी अभिजीत आबा पाटील यांनी प्रयत्न केले आहेत तर दुसरीकडे माजी आमदार बबन दादा शिंदे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल करण्यात येत आहे ते पत्र 2025 सालातील मे असून आहे त्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून विद्यमान आमदार अभिजीत (आबा) पाटील यांच्याबाबतही बोलले जात आहे.
याबाबतीत आम्ही विद्यमान आमदार अभिजीत आबा पाटील यांचे स्वीय सहायकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तू संपर्क होऊ शकला नाही दोन्ही बाजू कडून जरी शक्तीपीठ महामार्गासाठी श्रेय घेण्याची सुरू असले तरी एकंदरीत हा शक्तीपीठ महामार्ग माढा तालुक्यातून जात असल्यामुळे ज्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी यासाठी भूसंपादन होणार आहेत त्या सर्व शेतकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण यामुळे पाहायला मिळत आहे..
