
माळशिरस तालुक्यात एमआयडीसी मंजूर नसताना कशासाठी आहे श्रेयवाद:- भानुदास सालगुडे-पाटील
आजी-माजी आमदार बरोबरच विद्यमान आमदार व खासदारांना याच्या २६ तारखेच्या आमसभेत द्यावे लागणार जनतेला प्रत्युत्तर?
अँड सोमनाथ वाघमोडे व भानुदास सालगुडे पाटील यांच्या प्रयत्नातून ‘गारवाड’ म्हसवड येथे नवीन दहा हजार एकरात होणार नवीन एमआयडीसी!
सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक दृष्ट्या मोठ्या समाजाला जाणाऱ्या माळशिरस तालुक्यात मागील आठवड्यापासून एमआयडीसी बाबत अनेक व उहा-पोह पाहायला मिळत असून, माळशिरस तालुक्यात ज्या राजकीय नेते मंडळींनी मागील आठवड्यापासून एमआयडीसी मंजुरीची जाहिरातबाजी केली. व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती मी एमआयडीसी मंजूर केली असे जनतेला दाखवून श्रेया घेण्याचा जो केविलवाना प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न आता जनतेनेच हाणून पाडला असून. अशा कुठल्याही प्रकारची एमआयडीसी या ठिकाणी मंजूर झाले नसल्याचे माळशिरस तालुक्यातून बोलले जात आहे..
याबाबत सविस्तर माहिती अशी की; मागील १५ दिवसापासून माळशिरस तालुक्यातील येळीव MIDC मंजूर झाल्याचे एक पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत असून हे पत्र माजी आमदार गटाकडून व विद्यमान खासदार व आमदार यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर पोस्ट करून सर्व माळशिरस तालुक्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू होते.. या अनुषंगाने माहिती घेतली असता अशी कोणतीही एमआयडीसी मंजूर झालेली नसून त्यासाठी फक्त पाठपुरावा सुरू असल्याचे समजत आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे नेते भानुदास सालगुडे पाटील यांचे चर्चा केल्यास असे समजले की अशा कुठल्याही प्रकारची एमआयडीसी बाबतची शासकीय जाहिरात प्रसिद्ध झाली नसून ही फक्त सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक असून आम्ही स्वतः यासाठी अडवोकेट सोमनाथ वाघमोडे व मी स्वतः यासाठी प्रयत्न करत असून माळशिरस तालुक्यातील गारवाड येथे १० हजार एकरामध्ये एमआयडीसीसाठी आम्ही प्रयत्न सुरू केला असून लवकरच याची मंजुरी मिळून आम्ही एमआयडीसी उभे करू व संपूर्ण माळशिरस तालुक्यातील बेरोजगारी संपवण्याचा प्रयत्न करू अशा यावेळी सालगुडे पाटील यांनी सांगितले.. याबाबत त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधी चर्चा केली असता असे समजते की गारवाड/म्हसवड येथे प्रस्तावित एमआयडीसी असून त्याच्या शेजारी सातारा जिल्ह्यातील माण येते सुद्धा अशा प्रकारची एमआयडीसी मंजूर असल्याचे समजत आहे व प्रत्यक्ष कोणत्याही कामाला अजूनही सुरुवात झालेली नसून फक्त सोशल मीडिया व बातम्यांच्या माध्यमातून एमआयडीसी च्या बातम्या येत असल्याचे दिसत असून त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एमआयडीसी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे यावेळी भानुदास सालगुडे-पाटील यांनी सांगितले…
कोट
माळशिरस तालुक्यामध्ये एमआयडीसीच्या माध्यमातून जी जनतेची दिशाभूल सुरू आहे त्याला येत्या आमसभेमध्ये आम्ही जाहीरपणे एक खासदार व तीन आमदारांना जाहीर प्रश्न विचारणार असून याची उत्तरे या सर्व आमदारांनी द्यावीत अशी आमची प्रामाणिक मागणी आहे.
भानुदास सालगुडे-पाटील