
खासदार धनंजय महाडिक यांची मोहोळ दक्षिणचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष रमेशजी माने यांनी घेतली सदिच्छा भेट!
(मोहोळ तालुक्यातील भाजपच्या कार्यकारणीचा घेतला खासदार साहेबांनी आढावा)
कोल्हापूर येथे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची आज मोहोळ तालुक्यातील भाजपच्या, पदाधिकाऱ्यांनी राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांची कोल्हापूर येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये सदिच्छा भेट घेतली.. यावेळी संपूर्ण सोलापूर जिल्हा विशेष त्या मोहोळ तालुक्यातील नवीन झालेल्या निवडीबाबत मोहोळ दक्षिणचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष रमेश जी माने यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली.. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कोल्हापुर जिल्ह्यातील, भारतीय जनता पार्टीची सर्व बुथ,रचना, विशेष कार्यकारी अधिकारी पद, व इतर पदाबाबत त्यांनी चर्चा केली…
यावेळी मोहोळचे नूतन दक्षिण तालुकाध्यक्ष रमेश माने यांनी खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार केला...
यावेळी माजी तालुकाध्यक्ष सुनिल रावसाहेब चव्हाण, संचालक अनिल आगतराव गवळी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, लिंगराज शेंडगे, तानाजी पुजारी व मोहोळ तालुक्यातील व भिमाच्या कार्यक्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते…