
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग कारखान्यामध्ये पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्ष लागवड!
(इतर संस्थांना व कारखान्यांना प्रेरणादायी ठरेल असा स्तुत्य उपक्रम:- कैलास खुळे सर)
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदशनाखाली कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास खुळे व कार्य. संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदरचा कार्यक्रम हा इतर संस्थाना व कारखान्यांना प्रेरणादायी असून प्रत्येक कारखान्याने याप्रमाणे वृक्ष लागवड केल्यास निसर्गाचा समतोल राहण्यास मदत होईल. अशी इच्छा कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास खुळे यांनी व्यक्त केली.यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, 5 जून हा दिवस प्रत्येक वर्षी पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे हा पर्यावरण दिनाचा मुख्य हेतू असतो. मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक असून त्यामध्ये मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. त्यामुळे मृदावरण, जीवावरण, जलावरण, वातावरण या सर्व घटकांचा समावेश पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखेमधून केला जात असून त्याद्वारेही पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम मोठया प्रमाणात केले जात आहे. जेणेकरुन पर्यावरण विषयक एकसंघ आणि संतुलित दृष्टीकोन प्रत्येक मानवामध्ये निर्माण होईल. कारखान्याने आजपर्यंत सुमारे २५००० वृक्षांची लागवड केली असून सदरचे वृक्ष अत्यंत चांगल्या प्रकारे जोपासले आहेत. कारखान्याच्या या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने सर्वश्रेष्ठ “वनश्री पुरस्काराने” कारखान्यास सन्मानीत केले आहे. यावर्षी पाऊस लवकर सुरु झाल्याने मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्याची योग्य प्रकारे जोपासना करणेचे नियोजन कारखान्याने केले असून यामध्ये वड, आंबा, चिंच, नारळ, पिंपळ इ. वृक्षांचा समावेश आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, प्रोडक्शन श्री.एम.आर.कुलकर्णी, केन मॅनेजर श्री.एस.सी.कुमठेकर, चीफ अकौंटंट, श्री.आर.एम.काकडे, चिफ इंजि. श्री.ए.डी.बारटक्के, को-जन मॅनेजर श्री.एस.एस.विभुते, डिस्टीलरी मॅनेजर श्री.आर.एस.पाटील, ऊस विकास अधिकारी श्री.एस.पी.भालेकर, संगणक प्रमुख श्री.टी.एस.भोसले, कार्यालयीन अधिक्षक श्री.बी.एस.बाबर, मटेरियल मॅनेजर श्री.एम.जे.देशपांडे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर श्री.समीर सय्यद, सिव्हील इंजिनिअर श्री.एच.एस.नागणे, हेड टा.कीपर श्री.एम.एन.कदम, इस्टेट मॅनेजर श्री.आर.डी.गाजरे, पर्यावरण अधिकारी श्री.एस.ए.ताम्हाणे, इत्यादी उपस्थित होते.
डॉ.यशवंत कुलकर्णी
कार्यकारी संचालक