कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 1,21,111 व्या साखर पोत्याचे पूजन संपन्न!
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2024-25 मध्ये उत्पादित झालेल्या 1,21,111 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक), यांचे उपस्थितीत व संचालक मा.श्री.सुदाम बापू मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास खुळे आणि संचालक व कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थीत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी माहिती दिली की, कारखान्याचा गळीत हंगाम 2024-25 हा सुरळीत सुरु आहे. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत असून गळीत हंगाम 2024-25 मध्ये गाळपास येणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास चांगला दर देणार असून गळीत हंगाम 2024-25 मध्ये प्रतीदिन सरासरी 8.500 मे.टनाप्रमाणे ऊस गाळप करीत आहोत. आणखी यामध्ये वाढ होवून तो प्रतिदिन 9,000 मे.टनापर्यंत गाळप हाईल. शासनाने सिरप ते इथेनॉल वरील बंदी उठविल्यामुळे कारखान्याचे सुमारे 1200 ते 1500 मे.टन ऊस गाळप जास्तीचे होत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांचा ऊस वेळेवर गाळप होईल. या हंगामात कारखान्याचे 12 लाख मे.टन ऊस गाळपाचे उदीष्ट असून कारखाना ते पुर्ण करणार आहे. कारखान्याचा को-जन प्रकल्प, आसवानी प्रकल्प सुरळीत सुरु आहेत.
यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कारखान्याच्या ऊस उत्पादकांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात जुन व जुलै मध्ये केलेमुळे सुमारे 4.00 ते 5.00 लाख मे.टन ऊस या महिन्यातील आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांच्या ऊसतोडी वेळेवर करणेसाठी कारखाना व्यावस्थापणाने योग्य नियोजन केले आहे. या हंगामात कारखान्याचे 17 दिवसात 1,33,068 मे.टन ऊसाचे गाळप होवून 1,21,111 क्विं. पोती साखर उत्पादन केले आहे. को-जनरेशन मधून 75 लाख युनिट विज निर्मीती केली असून आसवानी प्रकल्पामधून 11 लाख बल्क लि.उत्पादन घेतले आहे. आसवनी प्रकल्पाकडील ज्युस ते इथेनॉल प्रकल्पही सुरु केलेला आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. दिनकरराव मोरे, श्री. उमेशराव परिचारक, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री. बाळासो यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.लक्ष्मण धनवडे, श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.हणमंत कदम श्री.सुदाम मोरे श्री.विजय जाधव, श्री.किसन सरवदे, श्री.शामराव साळुंखे, श्री.सिताराम शिंदे, श्री.राणू पाटील, तज्ञ संचालक श्री.दाजी पाटील, श्री.दिलीप गुरव कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.