एच व्ही देसाई हॉस्पिटल महम्मदवाडी पुणे व रोटरी क्लब अकलूज, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी शिबिर संपन्न!
(मा.आमदार, प्रशांतमालक परिचारक व कारखान्याच्या माध्यमातून आम्ही वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतो:-मा. डॉ. यशवंत कुलकर्णी साहेब)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आज २३ फेब्रुवारी हा रोटरी क्लबचा १२१ वा स्थापना दिवस आहे. या स्थापना दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब अकलूज कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपुर आणि एच व्ही देसाई हॉस्पिटल महम्मदवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत मधील मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन शेतकरी भवन कारखाना ऑफिस श्रीपुर येथे करण्यात आले होते..
एच व्ही देसाई हाॅस्पीटल महंम्मदवाडी पुणे, व रोटरी क्लब ऑफ अकलुज, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि, श्रीपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत मधुमेह तपासणी शिबिर. शिबिर आज श्रीपुर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या, शेतकरी भवन शेतकरी भवन, येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कर्मयोगी ही सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे, कार्यकारी संचालक मा. डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, व मोफत मधुमेह तपासणी, शिबिरामध्ये कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व पंढरपूर तालुक्यातील अनेक गरजू नागरिकांनी यामध्ये आपली उपस्थिती दर्शवली. अकलूज व कारखाना परिसरातील अनेक गोरगरीब शेतकऱ्यांनी व नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला..
यावेळी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी कारखान्याचे, सर्व विभागाचे अधिकारी खाते प्रमुख सर्व संचालक सर्व कर्मचारी, व कामगारांनी या चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिल्यामुळे हे शिबिर अत्यंत उत्साही वातावरणामध्ये पार पडले..
या शिबिरामध्ये आत्तापर्यत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू व मधुमेह तपासणी मध्ये अडीचशे ते तीनशे नागरिकांनी सहभाग नोंदविला असून यामध्ये प्रामुख्याने मोफत नेत्र तपासणी कडे जास्त प्रमाणात नागरिकांचा कल दिसून येत असून या डोळे तपासणी नंतर योग्य वाटल्यास त्यांना पुणे येथील एच व्ही देसाई हॉस्पिटल महम्मदवाडी येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी नेण्यात येणार आहे…
या शिबिरासाठी कारखान्याच्या सर्व अधिकारी कर्मचारी व कामगारांनी मोठे परिश्रम घेतले आहे.
