
जिवाची बाजी लावत कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार धनाजी घोरपडे यांनी वाचवले अनेक नागरिकांचे प्राण!
(स्थलांतरित लोकांची भेट घेऊन जेवणाची व राहण्याची सोय करत केली व उत्पादित नागरिकांची सेवा)
(नरखेड बीड मधील एकुरखे गावातील नागरिकांना केले पोलीस अंमलदार धनाजी घोरपडे यांनी स्थलांतरित)
(विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी धनाजी घोरपडे यांचा केला प्रशस्तीपत्रक देऊनगुणगौरव)
मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नरखेड बीट मधील एकुरखे या गावांमध्ये सीना नदीला आलेल्या प्रचंड महापुरामध्ये गाव हे पाण्याने वेढलेले असताना, व संपूर्ण गावाच्या चारी बाजूला पाणी असताना आपल्या जीवाची कुठलीही काळजी न करता नरखेड बिटमधील हवालदार धनाजी घोरपडे यांनी जवळजवळ या गावातील ४० ते ५० लोकांना पाण्यातून बाहेर काढून एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्व नागरिकांची सुसंवाद साधत सुरक्षित स्थळी त्यांना पोचवून त्या ठिकाणी त्या सर्व लोकांची भेट घेऊन जेवणाची व राहण्याची सोय करण्याचेही मोठे काम त्यांनी याप्रसंगी केले आहे. राजकीय व सामाजिक नेते एकीकडे सोशल मीडियावर स्टंटबाजी करत असताना एका कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस हवालदार ने अशी मदत केल्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात त्यांच्यावर कौतुकांचा वर्षा होत आहे. याची सर्व नागरिकांनीही मोठी दखल घेतली असून सर्व जनतेतून त्यांच्या या कार्याबाबत त्यांचे सोशल मीडिया व भ्रमणध्वनी वरून अभिनंदन करण्यात येत आहे.
